Tuesday, 9 June 2026

पराशर नेमकं काय आहे

 अरे..इतक्या वर्षांपासून पराशरचं काम सुरू आहे, आणि आम्हाला आता एवढ्यातच माहीत झालं. तुम्ही जास्त प्रमोशन करत नाहीत का? 


ज्यांना पराशर माहीत नाही त्या लोकांसाठी सांगतो,

 *पराशर ची संकल्पना काय आहे?* 


पराशर एक अशी जागा आहे, जिथं तुम्ही आपल्या








मित्र मैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत, ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत आणि अगदी एकट्याने सुद्धा येऊ शकता. बरं इथं वयाची अट नाही, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकं येऊ शकतात.


 *पराशर कुठं आहे?* 

आळेफाट्याजवळ, राजुरी गावात असलेलं पराशर, पुण्यापासून १०० किमी (२-२.५ तास), मुंबईपासून १८०किमी (४-५ तास), नाशिकपासून ११५ किमी (२ तास) आणि अहिल्यानगर पासून ७५किमी (१.५ तास) अशा अंतरावर आहे.

https://maps.app.goo.gl/mEaT8saDJNT7ocgP8


 *पराशर मधे काय काय आहे?* 

निसर्गपूरक रचना, बेसिक सोईसुविधांसोबत जपलेली सात्विकता, शेणाने सारवलेली भुई, छान वाढलेली गर्द झाडी, पक्षांचा किलबिलाट, घरगुती चवीचं घरगुती जेवण, मन रमवायला छोट्या छोट्या जागा जिथं विविध खेळ मांडलेले असतात, ग्रामीण वस्तु संग्रहालय आहे, बियाण्याची बँक आहे, मातीच्या गोष्टी सांगणारं आणि मातीचा प्रत्यक्ष फील देणारं माती संग्रहालय आहे, मचाण आहे, झोके आहेत...आणि या सर्वांच्या मधे तुम्ही असता व तुमच्या दिमतीला आम्ही.


 *पराशरवर का यायचं?* 

शेतीमातीच्या गमतीजमती अनुभवायला, शेतात काम करायला, गायीबकरीला खाऊ घालायला, शेतकऱ्याच्या घरची संध्याकाळ जगायला, निसर्गाच्या सानिध्यात रमायला, पुस्तकासोबत आयुष्याचीही काही पानं चाळायला, मातीत हात घालायला, मातीसोबत खेळायला, कुटुंबांसोबत क्वालिटी टाईम इन्व्हेस्ट करायला, नात्यांची वीण पुन्हा घट्ट करायला, स्वतःचा शोध घ्यायला, एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारायला, आपल्या मुलांना गाव दाखवायला, ज्येष्ठ मंडळींनी मजा करायला, आजूबाजूचा परिसर फिरायला....यादी संपणार नाही.


 *पराशर वर का येऊ नये?* 

तुम्हाला डीजेच्या तालावर नाचायचे असेल, स्विमिंग पूल रेन डान्स हवा असेल, पार्टी करायची असेल, टीव्ही हवा असेल, एसी चीच सवय असेल, रेस्टॉरंटचे जेवण हवे असेल, खूप साऱ्या अँक्टिव्हिटी करायच्या असतील, अडव्हेनचर गेम हव्या असतील, खूप गर्दी हवी असेल...तर अशा रिक्वअरमेंट असलेल्या पाहुण्यांचा इथं भ्रमनिरास होऊ शकतो.


 *पराशर कोणासाठी आहे?* 

ज्यांना शांतता आवडते, ज्यांना रोजच्या धकाधकीच्या जगण्यातून थोडी शांतता हवी आहे. ज्यांना स्वतःला क्वालिटी टाईम द्यायचा आहे, कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. निसर्गाशी, मातीशी कनेक्ट व्हायचं आहे. स्वतःला शोधायचं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अनुभवायची आहे. गाव समजून घ्यायचं आहे. आपल्या मुलांना जगण्यातील व्हॅल्यू द्यायचे आहेत, डिटॉक्स व्हायचं आहे, स्क्रीन टाइम कमी करायचा आहे, आयुष्यातील प्रायोरिटी ठरवायच्या आहेत. जगण्यातील चाचपड सुधारायची आहे.....अशा सर्व पाहुण्यांसाठी पराशर आपलं हक्काचं आणि मनातलं ठिकाण आहे.


 *पराशर का सुरू केलं होतं?* 

शहर व गाव, धावपळ ते निवांतपणा, चंचलपणा ते शांतता, कन्फ्युजन ते स्पष्टता, स्क्रिन टाइम ते मी टाईम, मी आणि तू...अशा अनेक क्षितिजांना जोडणारा, त्यातले अंतर कमी करणारा एखादा धागा, प्लॅटफॉर्म असावा म्हणून, २०११ साली, पराशरची सुरवात झाली. आतापर्यंत जवळपास ३० देशातले पैपाहुणे पराशर वर येऊन गेले. कोणी त्याला कृषी पर्यटन म्हणतं कोणी संस्कृती पर्यटन म्हणतं, कोणी ग्रामीण पर्यटन म्हणतं, कोणी फॉर्म कॅफे म्हणतं कोणी फॉर्म हाऊस म्हणतं, कोणी फार्मिंग थेरपी सेंटर म्हणतं...पराशरची नावं काहीही असली तरी ओळख मात्र एकच आहे... आपलं हक्काचं घर.


पराशरची सगळी माहिती आपणाला खालील लिंक्स वर मिळेल 


🌐 वेबसाइट

www.parasharagritourism.com


📺 यूट्यूब

https://youtube.com/channel/UCAGXLTe4pxOlOiFFstXJZcg


📸 इंस्टाग्राम

https://www.instagram.com/parasharagritourism


📞 *बुकिंग व माहिती* 

09970515438

07038890500

09028844222

07020092221

Parashar Agri & Culture Tourism

No comments:

Post a Comment