Saturday, 22 May 2021

Parashar Agri & Culture Tourism, Junnar- an unique place for agritourism, ecotourism, culture tourism & understanding India.

Parashar Agri & Culture Tourism, Junnar

an unique place for agritourism, ecotourism, culture tourism & understanding India.

Agriculture is not only farming, its culture of human beings. Though India is agrarian country unfortunately there is huge gap between India & BHARAT which is increasing gradually. Being born in farmer’s family, after studying post graduate in agriculture, working for farmer’s suicide issue with NABARD bank & resigning the permanent job from state bank of India, in 2011, I came to my native place, Rajuri a small village in Pune to contribute in bridging the gap between India & BHARAT. 

While studying how old is this agriculture as culture, I came across with India’s 1st agriculture scientist Sage Parashara, who wrote 1st manuscript on agriculture in India by name “Krushi Parashara”. We have decided to start a place where urban people can come to know about agriculture, to experience the agriculture, to learn about source of food & respect the farmer & farming, to know about rural culture, to know about Bharat, to study stake holders of rural economy. 



4th Sept 2011 is the opening day of Parashar Agri & Culture tourism which has developed with mortgage of my house. Parashar agritourism is community tourism model where farmers are involved in it, Design is based on natural material, additionally local vendors, and self help groups, artisans, folk artists also benefited. That’s why OUTLOOK TRAVELLER enlisted us 1st in India’s top 10 rural tourism centers in 2012 in October rural day’s special issue. All people want to migrate towards cities but through this model we have proved that educated youths can create an employment in villages with very responsible way. This type of tourism is not ordinary one; it helps you to find yourself & brings values of life in living. All this story we have presented in responsible tourism India 2016, and we were in top 10 players. With responsible tourism award, this thought will spread all over India & people can replicate at their place.

Parashar Agritourism, Junnar



Parashar Agritourism is community tourism project where different layers of rural community such as farmers, rural artisans, and self help groups, small vendors, rural folk artists are part of it. Accommodation facilities have designed eco friendly with help of local people with natural material on barren land & near about 60 acres of other farmer’s land having different cropping patterns, cow farm, poultry farm, goat farm, vermi compost unit, farm pond, grape orchards, dairy co-operative etc for tourist to experience the village structure & farmer’s life. Parashar Agritourism is a sustainable model of livelihood improvement of local people which is easy to replicate. Parashar Agritourism , Junnar becoming future market for organic agri & processed food produce ,seasonal fruits & vegetables, art work of rural artisans such as quilts etc.

Area of operation:



Parashar Agritourism is working in Rajuri, a small village of JUnnar tahsil, Pune district. We help to urban people, school students to understand the farming, village, farmer’s life, to know their source of food; we help to urban people to rediscover themselves & values of life, to study about rural economy, rural architecture etc.  From village side we are trying to prove that villagers need not migrate for an employment. To do farming is good thing; to live in rural India is privilege, that self esteem we are incorporating in rural youths.  We are facilitator for rural & urban people for their own need fulfillment which are identified by us.

Achievements

2011 is foundation year of Parashar Agritourism.  In 2012 we are enlisted by OUTLOOK TRAVELLER in India’s top 10 rural tourism centers, in 2013 we have received “कृषी पर्यटन गौरव पुरस्कार” from Agritourism Development Corporation & get registered with MTDC’s culture tourism scheme “Mahabhraman”.  National Seed Corporation invited us for agritourism consultancy in 2014. We have received “ग्रामोन्नती कृषी सन्मान-२0१७” from Krushi Vidnyan Kendra, Narayangaon, Pune.  We are invited for guest lectures, national & state seminars on rural tourism, community tourism, agritourism, rural entrepreneurship & agri allied business on several platforms. In 2018 we have wrote a book on agritourism which is published by Sakal publications. Right now we are working as tourism trainer & consultant. We have received national & international guests to experience agri & culture tourism with the exposure visit to study the concept of agritourism. Scholars, researchers & students are regularly coming to understand rural culture, stake holders of rural economy, factors affecting rural economy, rural architecture, rural heritage and many more things.

Initiatives/Policies for responsible tourism




Since 1st day of work we have focused on responsible tourism with sincere efforts. We have strictly banned non veg meal, alcohol consumption & smoking at our premises. We are not using plastic at our place & developed a library for guests to know about rural culture. We have displayed rural accessories in museum form to make aware the guests about rural culture. Secondly we have an art gallery where different local and rural art forms are displayed. We have a counter for sale of fresh agriculture produce of nearer farmers and products designed by self help groups. We have designed our center conceptually based on culture tourism so visiting people especially foreigners can get knowledge about rural India.  Through our tourism consultancy services, we have dreamed that, we will incorporate this sense of responsible tourism at every corner of India.

Social media presence & feedback by our guests-

https://www.facebook.com/parasharagritourism/?ref=bookmarks

https://www.youtube.com/results?search_query=parashar+agritourism+maharashtra

https://www.tripadvisor.in/Hotel_Review-g297654-d3833413-Reviews-Parashar_Agritourism-Pune_Pune_District_Maharashtra.html

Manoj Hadwale

Founder Director

Parashar Agri & Culture Tourism

Tourism Trainer & Consultant

09970515438/07038890500

manoj@hachikotourism.in

www.hachikotourism.in

 

 

 

Thursday, 20 May 2021

Junnar is the land of mystery & the mystery of land.

Junnar is the land of mystery & the mystery of land. 

Junnar is one of the tahsil from Pune district. it has total 187 villages, out of that 65 are tribal villages. The economy of Junnar is depends on agriculture with allied activities. Tourism will be the future stake holder of economy of Junnar. The location of Junnar is very prime as located in between 4 major cities viz Mumbai, Pune, Nashik & Ahmednagar. Aurangabad is also nearer one. Junnar is the next hot tourism destination. Junnar has 2500 yrs prosperous history, adventurous geography with Granger ghats like Malshej Ghat, Darya Ghat, Nane ghat. Junnar, subcapital of dynasty of Maharashtra, Satvahan kings known as Jirna Nagar at that time.
















 Junnar, only one tahasil in Maharashtra state having highest number of dams [Pimpalgaon Joga Dam, Chilewadi Pachaghar Dam, Yadgaon Dam, Manik Doh dam, Vadaj dam. World's's largest radio telescope, GMRT[Giant Meter Wave Radio Telescope, Khodad]is in Junnar. Historical Naneghat is in Junnar from where trading with other countries was there before 2500yrs. --Junnar, Birthplace of Maratha king Chhtrapati Shivaji Maharaj [Shivneri Fort, 1630] --Junnar has  7 mountain forts in Maharashtra state [Shivneri, Chawand, Nimgiri,  Narayangad, Hadsar, Jivdhan, Shindola] 

Junnar has 2 Ashtavinayak, temples of Lord Ganesha [Lenyari & Ozar] out of 8 ashtavinayaka. --Junnar has highest number of caves in Maharashtra [Lenyadri, Nane ghat, Chavand, Suleman, Manmodi, Tulja, Shivneri] --Junnar has several ancient religious places such as Khireshwar temple, Bhramhanathi temple, Kukadeshwar temple. 

Junnar is known for its fresh & healthy air known as "Sanitarium of India" where breathing problems can be cured easily. --Junnar has wide range of agriculture from traditional farming of rice up to the farming of export quality grapes. --Junnar Has largest density of leopord in world conserved 36 leopords in Manikdoh rescue center. 

Due to beautiful nature, attractive scenery shooting of several films is always going in Junnar. Fimls like Ravan, Tees Mar khan, Tingya, Chalte Chalte, Tapaal, Rakshas & several Add films also shooted in Junnar.  Junnar is also well known for its historic jama masjid & Iddgah.It is also known for the tombs of virious saints.One can explore the architecture of medieval periods such as Adilshahi. 

Nature lovers also visit these forts for their natural beauty the rare species of flowers, trees etc. Malshej Ghat is the place to visit in rainy season it has awesome water falls. Nowadays, most of the Hindi film directors prefer shooting their films here because of its natural beauty. Agriculture is not only farming, its culture of entire human being.

 3000 yrs ago Sage Parashara wrote 1st manuscripts of world on agriculture named "krushi Parashara" सुस्था भवंतु कृषकः धनधान्यसमन्विता[May farmers be happy & wealthy]was his main prayer. Junnar was his tapobhumi. his translated manusripts are in the library of Parashar Agritourism, Junnar. Films like Raavan, Tees Mar Khan, and many south Indian films are also attracted to this location.

 On 21st March 2018, Junnar has declared as special tourism zone by Govt of Maharashtra. This is the result of collective efforts of all Junnarkars. organizations like Junnar Tourism Development Organization, Shivaji Trail, Sahyadri Giribhraman Sanstha are working for tourism development in Junnar. People of Junnar are well aware about tourism, responsible tourism & sustainable tourism.

Public participation in Tourism development is very active. All administrative offices, academic institutions, farmers forums, hotel owners, self help group movement & citizens are actively participating in Tourism festivals like Grape festival, Mango Festival, Kite festival etc.  We all junnarkars are inviting you to explore, experience & enjoy the Junnar. Welcome to Junnar.

Manoj Hadwale

Founder Director

Junnar Tourism Development Organization

Parashar Agri & Culture Tourism

Hachiko Tourism Training & Consultancies.

Tourism Trainer & Consultant

Directorate of Tourism, Govt of Maharashtra

09970515438/07038890500

manoj@hachikotourism.in

पर्यटन-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासातील महत्वाचा घटक

 

पर्यटन-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासातील महत्वाचा घटक

प्रस्तावना

भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक भागाची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये असतात, काही भागात निसर्गाचे दान जास्त पडलेलं असतं तर काही भागात त्याची वानवा असते. त्या त्या ठिकाणची सामाजिक व्यवस्था ही तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर उभारली गेलेली असते. मग त्याच भौगोलिक परिस्थितीवर तिथलं अर्थकारण,तिथलं समाजकारण, तिथली सांस्कृतिक जडणघडण, शैक्षणिक व्यवस्था, रोजगाराचे माध्यम या सर्व गोष्टी आपसूक उभ्या राहतात. आपल्या महाराष्ट्रात, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र असे विविध भाग आपल्याला बघायला मिळतात. या भूभागात वर्गीकरण करताना आपण मुख्यत्वे भौगोलिक परिस्थितीचा विचार करत असतो. या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा मराठवाड्याचा विचार करतो, मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, भविष्यातील वाटचालीसाठी काही धोरण ठरवण्याची तयारी करतो, त्यावेळेस आपल्याला मराठवाड्याचा विविधांगाने अभ्यास करून उपलब्ध परिस्थितीतून, वर्तमानात असणाऱ्या अडचणींवर मात करत; भविष्यात कशा प्रकारे रोजगारनिर्मिती तयार करून, रोजगार निर्मितीची माध्यमे निर्माण करून इथलं अर्थकारण व  समाजकारण कसं शाश्वत करता येईल याचा अभ्यास केला गेला पाहिजे.





मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे येतात, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड. या प्रत्येक जिल्ह्याचं स्वतःचं वेगळं असं ऐतिहासिक स्थान आहे,  सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व आहे आणि अर्थकारणात एक वेगळी जागा आहे. वरकरणी बघता मराठवाड्याची अर्थव्यवस्था ही शेती आधारित आहे, येथील शेती ही कोरडवाहू असल्या कारणाने त्याच्या अडचणी खूप आहेत. सततची नापिकी, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांमध्ये, तरुणांमध्ये एक नैराश्याची भावना येणे सहाजिक आहे. तरीसुद्धा इथले शेतकरी, इथला तरुण, इथल्या महिला आपलं मनोबल उंचावत निसर्गाशी चार हात करत याठिकाणी ठामपणे उभे आहेत याचं खरंच मनापासून कौतुक आहे. मराठवाड्याच्या विकासाची परिभाषा ठरवताना ती जितकी शाश्वत असेल तितकीच ती मूल्यवर्धित असणारी असावी म्हणजे एखाद्या समस्येवर उपचार करताना ती वरवरचा असून उपयोग नाही तर त्याच्या खोलवर जाऊन त्याच्या मुळावर उपचार केले तर काळासोबत त्याच्यातून बाहेर पडणं सहज शक्य होईल.



मराठवाड्यात, शेती, उद्योग, शिक्षण व पर्यटन हे अर्थकारणाचे मुख्य स्रोत आहेत, मराठवाड्यात जे काही रोजगार आजमितीला उपलब्ध आहेत ती वरती नमूद केलेल्या चार घटकामधूनच मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. यात भर म्हणजे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक अशासकीय संस्था त्यांचे स्वयंसेवक मराठवाडाभर चालणारी जलसंधारणाची, सामाजिक माध्यमातली काम या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. ज्यांना यात काम करणे शक्य नाही ते शेतीकामासाठी स्थलांतरित होत आहेत. शेती, शिक्षण, उद्योग या क्षेत्राविषयी आपण सगळे जाणकार आहात, यांच्यातल्या खाचाखोचा, त्याच्यातली आव्हानं, समस्या आणि भविष्यातील संधी याविषयी आपणा सर्वांना ज्ञात आहे. या पार्श्वभूमीवर मी माझ्या गेल्या १० वर्षांच्या पर्यटनाच्या कामातील अनुभवाच्या अनुषंगाने, मराठवाड्यातील पर्यटनाची वाटचाल, पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, त्या रोजगारातून चालणारे अर्थकारण, पर्यटनाचा होणारा शेतीला फायदा, पर्यटनाचा स्थानिक तरुण, महिला बचत गट यांना होणारा फायदा आणि शेतमाल व प्रक्रिया मालाची चालती फिरती बाजारपेठ याची कशाप्रकारे सांगड घालता येऊ शकते याविषयी मी नक्कीच काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो.

 

 

माझ्या विषयी थोडक्यात

माझं नाव मनोज भिमाजी हाडवळे मुक्काम पोस्ट राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझं शिक्षण एमएससी अग्री. बीएससी माझं बदनापूर कॉलेजला झालं एम एस सी परभणी विद्यापीठात झालं शेतकरी आत्महत्या प्रश्नावर काम करण्यासाठी मी वर्ध्याला आधी खाजगी संस्थेत आणि नंतर बँकेत एकूण पाच वर्ष काम केलं आणि 2011 पासून कृषी आधारित पर्यटन ही संकल्पना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राबवत आहे. जुन्नरची  अर्थव्यवस्थाही शेती आधारित अर्थव्यवस्था आणि शेती आधारित अर्थव्यवस्थेला पूरक असं पर्यटनाच्या माध्यमातून काही रोजगार निर्मिती होतेय का यासाठी आम्ही एक लोकचळवळ उभारली आणि जुन्नर पर्यटन मॉडेल त्याच्यातून उभ राहिलं. या लोकं चळवळीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्याने  २१ मार्च 2018 साली जुन्नरला शासनाने विशेष पर्यटनाचा दर्जा दिला. 



जुन्नरमध्ये असणाऱ्या पर्यटन स्थळांना देश-विदेशातील पर्यटक भेट देत असताना इथली स्थानिक कृषिसंस्कृती, स्थानिक वारसा स्थळे, मंदिरे, दर्गे यांना भेटी देतातच पण त्यासोबत इथल्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या स्थानिक शेतमाल त्या शेतमालावर केलेले प्रक्रिया इत्यादी पदार्थ सुद्धा ते विकत घेऊन जात असतात. याचाच एक भाग म्हणून पर्यटन विभागाच्या सहकार्याने जुन्नर तालुका स्तरावर आम्ही द्राक्ष महोत्सव आंबा महोत्सव यासारखे उपक्रम पण राबवले आहेत. 

या अनुभवावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्थेने मला आंबेजोगाई चा पर्यटन आराखडा तयार करण्यासाठी निमंत्रित केले होते आणि आपण आंबेजोगाई पर्यटनातील संधी ओळखून एक आराखडा पण त्यांना सादर केलेला आहे. त्याचा सातत्याने पाठपुरावा करत स्थानिक मंडळींना जागरूक बनवण्यात यश आले. मग स्थानिक मंडळींनी पुढाकार घेऊन अंबेजोगाईची पर्यटन पुस्तिका तयार केली, तिचे प्रकाशन १६ फेब्रुवारी २०२१ रोजी, पर्यटन मंत्री ना आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते झाले.  

माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एकूण सहा वर्षाचा काळ मराठवाड्यात राहिला आहे. या सहा वर्षाच्या काळात माझी वैचारिक, तात्विक जडण-घडण झाली आहे. मला शेती व शेतकरी खऱ्या अर्थाने कळण्यास मदत झाली, त्यांच्या समस्या कळण्यास मदत झाली.  मी या सर्व गोष्टींना एका पर्यटनाच्या नजरेतून पाहतो. कृषी ग्रामीण व संस्कृती पर्यटन या थीम वर काम करत आपण एका तालुक्याचं पर्यटन मॉडेल तयार केलं. या कामाचा अनुभव सांगण्यासाठी आपल्याला विविध व्यासपीठांवरून बोलवण्यात आलं. वेगवेगळ्या ठिकाणी कृषी व ग्रामीण पर्यटनाचा प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले.

१०  वर्षांच्या कामाचा अनुभवातून आपण कृषी पर्यटन एक शेतीपूरक व्यवसाय हे पुस्तक लिहिलं, जे २०१८ मध्ये सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलं. ज्याचा उपयोग करून अनेक शेतकरी आपल्या शेतात कृषी पर्यटन केंद्र उभारत आहेत आणि छान प्रकारे चालवत आहेत. जसं एक जुन्नर पर्यटन मॉडेल उभे राहिलं आहे त्यामाध्यमातून इथला शेतकरी उभा राहिला आहे, शेती पूरक व्यवसाय म्हणून पर्यटनाकडे बघत आहे, एक चालती फिरती बाजारपेठ पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या गावात आपल्या परिसरात येत आहे. आमचं स्वप्न आहे जुन्नर पर्यटन मॉडेल राज्यातल्या अनेक ठिकाणी अवलंबलं जावो, स्थानिक शेतकऱ्यांनी, स्थानिक तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि पर्यटकांना फक्त पर्यटक न समजता आपल्या ताज्या/प्याकिंग केलेल्या व प्रक्रिया केलेल्या शेतमालाचा ग्राहक समजावे असं मला वाटतं.

मराठवाड्यातील रोजगाराच्या संधी पर्यटन

मराठवाड्याच्या शेती ,उद्योग व शिक्षण आधारित अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटन हा खूप मोलाचा घटक आहे की ज्यातून फक्त थेट रोजगारनिर्मिती होणार नाही तर त्या अनुषंगाने शेतीसाठी, शेतीच्या, तंत्रज्ञानाच्या विकासासाठी,शेतमालाच्या निर्यातीसाठी खूप मदत होऊ शकणार आहे. मराठवाड्यामध्ये, औरंगाबादला जागतिक वारसा स्थळांचा लेणीसमूह आहे, धार्मिक पर्यटनाच्या नजरेतून, सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, तुळजापूर, अंबेजोगाईची योगेश्वरी, पैठण इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. त्याचसोबत तेर जे जुन्नर सारखेच सातवाहन कालीन व्यापारी केंद्र आहे ज्याला २००० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तगर लक्ष्मी कि ज्याला इंडियन dol म्हणतात अशी युनिक गोष्ट तेर मध्ये आहे, त्रिविक्रमाचे मंदिर आहे. उस्मानाबाद, तुळजापूर व तेर या भागात धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, अध्यात्मिक पर्यटन, वारसा पर्यटन, कृषी व ग्रामीण पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात संधी आहेत. 




मी आंबेजोगाईचा पर्यटन आराखडा बनवत असताना, तिथले कोरीव मंदिर, लेणीसमूह, दासोपंतांची पासोडी, मुकुंदराज यांची विवेकसिंधु इत्यादी गोष्टी फार जवळून बघितल्या. फक्त एकटे आंबेजोगाईत एवढ्या गोष्टी असतील तर संपूर्ण मराठवाड्यात किती आणि काय काय बघण्यासाठी असेल?  पर्यटन विभागाला प्रत्येक दुर्गम ठिकाणांच्या पर्यटन स्थळापर्यंत पायाभूत सुविधा उभारणे शक्य नाही. जर या पायाभूत सुविधा स्थानिक, पर्यटन विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून, स्थानिक  गावकऱ्यांनी उभारल्या, युवकांनी गाईडचं काम केलं,  महिला बचतगटांनी स्थानिक खाद्यसंस्कृतीची बाजू सांभाळली तसेच स्थानिक चवीचे विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आणि या सर्वाचं आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सादरीकरण करत मार्केटिंग केलं तर मला वाटतं की मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात, राज्यातले, देशातले आणि परदेशातील पर्यटक नक्कीच पोहोचतील. आणि या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे माध्यम उपलब्ध होईल





या येणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांना आपण,आपल्या जवळचा शेतमाल विक्रीसाठीची संधी निर्माण करू शकतो. यातुन अनेक प्रकारे चालती फिरती बाजारपेठ आपल्या शेतामध्ये, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला उभी राहील. पर्यटनाच्या माध्यमातून फक्त अर्थकारणात हलत नाही तर पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाण-घेवाण होते, वैचारिक दृष्टिकोन विकसित होतो, समाजकारण वाढीस लागतं. जगाच्या कानाकोपऱ्यात नेमके चाललय काय हे कळायला मदत होते. महिलांचं सबलीकरण होतं, त्यांच्यात आत्मविश्वास दुणावतो, तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाची भर पडते आणि आपल्या मनातील मागासलेपणाचा न्यूनगंड निघून जाण्यास मोलाची मदत होते,  हे मी माझ्या १० वर्षाच्या अनुभवातून निश्चितपणे सांगू इच्छितो.

 ज्यावेळेस आपण मराठवाड्याचा विकास व्हावा किंवा मराठवाड्याचा विकास करायचा आहे या उद्देशाने एकत्र येतो, त्यावेळेस आपण विकासाची व्याख्या अतिशय व्यापक प्रमाणात करायला हवी. इथल्या अर्थकारणाचे स्रोत, आपण वेगवेगळ्या अंगाने शोधायला हवेत आणि शक्य त्या गोष्टीचा वापर करून समस्यांचे, अडचणींचे, संधीत रूपांतरण करायला हवे. जेव्हा काहीतरी कमी असतं तेव्हा ती एकप्रकारे संधी असते.  हे सर्व,  दहा-पंधरा वर्षांपूर्वी अशक्य होतं, पण आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये, आपल्या समस्या, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवता येतात, आपले उद्योग जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवता येतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, हेही मला माझ्या अनुभवातून सांगावसं वाटतं. पर्यटनातून ग्रामविकास, पर्यटनातून रोजगाराच्या संधी, कृषी व ग्रामीण पर्यटनातून शेतीचा शाश्‍वत विकास, संस्कृती व वारसास्थळाचे संवर्धन या माझ्या कामाच्या, आवडीच्या व अनुभवाच्या गोष्टी आहेत. यासाठी राज्यात, देशात मी सल्लागार म्हणून गेली पाच वर्षे काम करत आहे. माझ्या आयुष्यातील सहा वर्ष, मराठवाड्यात राहिल्यामुळे, मराठवाड्याशी माझी नाळ  जोडली गेलेली आहे आणि मला मनापासून वाटतं की मराठवाड्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये माझा खारीचा वाटा असावा. म्हणून मराठवाड्याच्या पर्यटन विकासासाठी, पर्यटनातून शाश्वत समाजाच्या विकासासाठी, मला नक्कीच काही जबाबदारी स्वीकारायला आवडेल. तरी पर्यटनातील संधींचा  मराठवाड्याच्या सर्वांनी विकासामध्ये सकारात्मकतेने विचार व्हावा ही मनापासूनची इच्छा.

कळावे

आपलाच

मनोज हाडवळे

पर्यटन प्रशिक्षक व पर्यटन सल्लागार

9970515438/७०३८८९०५००

manoj@hachikotourism.in